Monday, 4 August 2014

शिवरायांचे कर्तृत्व

छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. 
शौर्य,पराक्रम,शारीरिक सक्षमता,ध्येयवाद,कुशल संघटन,कडक व नियोजनबद्ध प्रशासन,मुत्सद्दीपणा,धाडस,द्रष्टेपणा..
असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.

 
छत्रपती शिवरायांनी

-  बालपणी,तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले..

-  पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला..

-  साध्या-भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला..

-  स्वत: निर्णय घेऊन स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधुन घेतले..

-  महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले,नवे निर्माण केले..

-  योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सुत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केले,तसेच फितुरी,दगाबाजी,अंतर्गत कलहाचाही सामना केला..

-  आक्रमणाच्या वेळी शिवतंत्राचा (गनिमी कावा) चातुर्याने वापर केला..

-  सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था,लढवय्या शुर सरदारांची व्यवस्था,सर्व धार्मिक स्थानांची व्यवस्था अशा अनेक व्यवस्था लावुन दिल्या..

-  सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून स्वराज्याच्या लोकशाही राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली..

-  राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला;विविध कलांना राजाश्रय दिला..

-  खचलेल्या,पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा,पराक्रमाचा,स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला..

या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात !

सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान,ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते..

|| जय शिवराय ||

Sunday, 4 May 2014

छत्रपती शिवराय दिसायला कसे होते ?

शिवाजी महाराज दिसायला कसे होते ?

शिवाजी महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेली अनेक माणसे त्यावेळी होती . पाश्चिमात्यात हेन्री ऑक्झेडन , निकालो मनुची , थेव्हनॉट , उस्टीक , इ. तर भारतीयात परमानंद , परकलदास इ. परंतू फारच थोड्या व्यक्तीँनी शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद्दल किँवा शारीरिक ठेवणीबद्दल प्रत्यक्षात नोँद करुन ठेवली आहे .
शिवछत्रपती कसे दिसत होते ...

इ.स. १६६४ मध्ये सुरतेच्या लुटीच्या वेळी वखारीतल्या इंग्रज अधिकारी एस्केलिऑट याने केलेले वर्णन-
"His personality is described by them , who have seen him , to be of mean stature (medium height) lower some what than i am (when) erect and of an excellent proportion . Actual in exercise ane whenever he speaks seems to smile , a quick and piercing eye and witter than any of his people."

अर्थ-
'शिवाजी आपल्या दक्षिणेकडील इतर मावळ्यांपेक्षा उजळ वर्णाचा असून मध्यम बांध्याचा आहे . त्याची मान व खांद्याचा भाग पुढे झुकलेला दिसतो ; परंतु शरीर मात्र अत्यंत प्रमाणबध्द आहे . कोणतीही गोष्ट नजरेत तत्काळ पकडणारी भेदक दूरदृष्टी हे त्याचे खास लक्षणीय वैशिष्ट्य आहे.'

इ.स. १६६६ साली फ्रेँच प्रवासी थेव्हनॉट वर्णन करतो ,
"This Raja is short and tawny , with quick eyes that shew a great deal of wit . He eats but ones a day commonly and is in good health ."

अर्थ-
"हा राजा ठेँगणा व पिवळसर गौर वर्णाचा आहे . नेत्र तेजस्वी असून बुध्दीमत्तादर्शक आहेत . तो दिवसातून फक्त एकदाच भोजन करतो आणि (तरीही) त्याची प्रकृती उत्तम आहे ."

इ.स. १६६६ मध्ये राजे आग्र्यात गेले असताना तिथे परकलदास याने राजांना पाहिले . तो लिहितो ,
" अर सेवाजी डेल तो हकीर छोटो सो ही देखता दीस जी । अर सुरती बहुत अजाइब गौरो रंग अपुछो राजवी देसौ जी । हिम्मती मरदानगी ने देखता ही असौ दिसो जू बहुत मरदानो हिम्मतबुलंद आदमी छो । सेवाजी के दाढी छै ।"

अर्थ-
" प्रथमदर्शी दिसण्यात शिवाजी हा बांध्याने किरकोळ आहे . पण त्याचा रंग विलक्षण गोरा आहे . त्याचे राजतेज असे की कोणीही त्याला पाहिले की आपोआपच वाटावे की हा राजाच असला पाहिजे . त्याची हिम्मत आणि मर्दुमकी पाहिली की हा बुलंद हिमतीचा मर्द माणूस असला पाहिजे असे वाटू लागते . शिवाजीला दाढी आहे ."

कॉस्मा द गार्द या पोर्तुगीजाने केलेले वर्णन (१६९५)
" With a clear and fair nature had given him the greatest perfections specially that they seemed to dart rays to fire . To these was added a quick , clear and acute intelligence."

अर्थ-
"राजांचा चेहरा मोहक होता . निर्सगाने त्याला असावी तशी चेहरेपट्टी दिलेली होती . विशेषतः त्याचे काळेभोर व विशाल नेत्र एवढे तेजस्वी होते की जणू त्यातून अग्निस्फुल्लिँग बाहेर पडत आहेत ."

राज्याभिषेकाप्रसंगी प्रत्यक्ष पाहून इंग्रज वकील हेन्री ऑक्झेडने शिवरायांचे लिहिलेले वर्णन-
"शिवाजी महाराज ४७ वर्षाचे असून देखणे होते . त्यांच्या चर्येवरुन त्यांची बुध्दीमत्ता व चाणाक्षपणा सहज ध्यानात येई . त्यांचा वर्ण इतर मराठ्यांपेक्षा पुष्कळच गौर होता . त्यांची दृष्टी तीक्ष्ण असून नाक सरळ व बाकदार होते . त्यांच्या दाढीस निमुळतेपणा असून मिशी बारीक म्हणजे विरळ होती . त्यांचे बोलणे निश्चयात्मक , स्पष्ट पण जलद होते ."

जय शिवराय !

Wednesday, 16 April 2014

शिवरायांची अर्थव्यवस्था

शिवशाहीत दुष्काळामुळे गावे ओसाड पडली होती. लोक उपासमारीने मरत होते किंबहुना व्याकुळ होउन जीव देत होते,जनावरे टाचा घासून मरत होती.नियतीने हा असा पसारा बाल शिवाजी महाराजांसमोर वयाच्या १२व्या वर्षी मांडला होता.
तीन वर्ष महाराजांनी या परिस्थितीचा अभ्यास करून समजून घेण्यासाठी वेळ घेतला.हा दुष्काळ कायम स्वरूपी निवारण होण्यासाठी दूरगामी प्रभावी ठरेल अशी अर्थनीती तयार केली आणि त्यानुसार महाराजांनी "स्वराज्य" नावाची २३वर्षाच्या दुष्काळावर मात करत उभी राहणारी आशियातीलच नह्वे तर जगातली सर्वात शक्तिमान अशी अर्थव्यवस्था निर्माण केली.

महाराष्ट्रातील लोकसंख्या आणि घनता याचा विचार करता महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील एक तरी माणूस स्वराज्याच्या सेवेत होता आणि स्वराज्यात सहसा शिपायाचा पगार १०० होन आजच्या चलनानुसार म्हणजे ६०,००० रूपये होता तर अष्टप्रधान मंडळातील मंत्र्यांचा वार्षिक पगार ६०० कोटी होता.आज जगातील सर्वात विकसित अशा अमेरिकेतसुद्धा व्यवस्थापकाला वार्षिक ६०० कोटीचे पॅकेज मिळत असेल तर आम्हाला दाखवा ???
म्हणजे कळेल,महाराजांनी या महाराष्ट्राला किती श्रीमंत केले होते.शिवाजी महाराजांची ही आर्थिक क्रांती जर आमच्या पोरांना अभ्यासक्रमात शाळा-महाविद्यालयात शिकवली तर आमची पोरं अमेरिकन कंपनी किंवा एमएनसी मधे काम करण्याचे स्वप्न न बाळगता त्या कंपन्या खरेदी करण्याचा सरळ सपाटा लावतील.
पण गरज आहे महाराजांना लढाई अन् कोणत्या धर्मात बांधून न ठेवता त्यांचं अर्थशात्र पोरांपर्यंत पोहचवण्याची..
जय जिजाऊ जय शिवराय